बराक ओबामा यांना नोबेल पुरस्कार प्रदान

December 10, 2009 2:14 PM0 commentsViews: 2

10 डिसेंबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार गुरूवारी देण्यात आला. नॉर्वे इथे झालेल्या एका शानदार समारंभात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्यांना शांततेचा नोबल पुरस्कार जाहीर झाला होता. अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेऊन ओबमांना केवळ 11 महिने झाले आहेत. या काळात अण्वस्त्रांचा प्रसार थांबविण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. अतिशय नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारत असल्याचं ओबामांनी म्हटलंय. तसंच आणखी एक जागतिक महायुध्द होण्यापासून जगाला रोखायला हवं असंही ओबामा म्हणाले. यावेळी ओबांमानी महात्मा गांधी, मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांची आठवण काढली.

close