अखेर बिग बी कंगनासोबत एकत्र

August 3, 2015 10:31 PM0 commentsViews:

03 ऑगस्ट : बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांना अखेर कंगना राणावत सोबत काम करण्याची संधी मिळालीच…क्वीन या सिनेमात कंगनाचं काम पाहिल्यानंतर बिग बी कंगनावर बेहद्द खुश झाले होते. त्यानंतर त्यांनी तिला खास बुके पाठवून तिचं जाहीर कौतुक केलं होतं. मात्र नुकतंच राजकुमार हिरानी यांनी एका जाहिरातीच्या निमित्तानं बिग बी अमिताभ बच्चन आणि कंगनाला एकत्र
आणलंय. त्यामुळे कंगनासोबत काम केल्याची इच्छा पूर्ण झाल्याबद्दल बच्चन यांनी या ऍड शूटचे फोटोज त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close