शेतकरीच शेतकर्‍यांच्या मदतीला,स्वखर्चाने सुरू केली चारा छावणी !

August 3, 2015 10:44 PM1 commentViews:

सागर सुरवसे, सोलापूर

03 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यात शिरापूरच्या अनिल पाटील या शेतकर्‍याने जनावरांसाठी मोफत चारा छावणी सुरू केलीय. सरकारी मदतीची वाट न बघता एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे स्वत:च स्वत:ची मदत करण्याचा निर्णय या शेतकर्‍यांनी घेतलाय. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट…

faramer solapur3ऑगस्ट महिना उजाडला तरी अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोलापूरमध्ये जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न बिकट होत चाललाय. अशा परिस्थिीतीत सरकारने चारा छावण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शिरापूरमधील अनिल पाटील या
शेतकर्‍याने सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्वखर्चाने चारा छावणी सुरू करून पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना दिलासा दिलाय.
शिरापूर पंचक्रोशीतील वडाळा, मोरवंची, रानमसले, आष्टा, हिंगणे या गावातील पिक पूर्णपणे जळून गेलीत.

जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात सिना नदीकाठी वसलेलं शिरपूर गाव…यंदा पावसाने ओढ दिल्याने सध्या असं ओसाड दिसतंय. पिकच नाही तर जनावरांना खायला चारा कुठून येणार…त्यामुळे गुरांना विकण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. ही स्थिती पाहून शिरपूरच्या
अनिल पाटील या शेतकर्‍याने पुढाकार घेत स्वखर्चातून चारा छावणी सुरू केलीय. तीही मोफत…

चारा छावणी तर सुरू करायची. पण शेतातलं बोअरचं पाणी आटल्यानं छावणीला पाणी पुरवठा कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मग यासाठी पुढे आले ताकमोगे बंधू… गावातल्या तरुण शेतकर्‍यांनीही आपला जळालेला उस जनावरं जगवण्यासाठी वापरलाय.

पंचक्रोशीतली 280 जनावरं या छावणीत आहेत. जनावरांवर मुलासारखा प्रेम करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ही मोफत चारा छावणी वरदान
ठरलीय.

2013 सालीसुद्धा अनिल पाटील यांनी 8 लाख रुपयांची पदरमोड करून चारा छावणी सुरू केली होती. आता सरकार बदललंय. पण,
परिस्थिती तीच आहे. म्हणूनच बळीराजाला अच्छे दिन येणार का, असाा सवाल, हा संतप्त शेतकरी विचारतोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sarvjeet Miragane

    Can i get any contact number of Anil Patil??

close