नागा बंडखोर आणि भारतामध्ये शांतता करार

August 3, 2015 11:03 PM0 commentsViews:

naga23452303 ऑगस्ट : भारतातल्या सगळ्यांत जुन्या समस्यांपैकी एक समस्या आज बर्‍याच अंशी सुटली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून खदखदणारं नागालँड आता शांततेत नांदण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज केंद्र सरकार आणि NSCN-IM या नागा बंडखोर संघटनेने शांतता करार केला. या करारावर स्वाक्षर्‍या झाल्या, तेव्हा गृहमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. हा शांतता करार ऐतिहासिक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. गेल्या 16 वर्षांत चर्चेच्या 80 फेर्‍या झाल्यानंतर हा करार झाला आहे. एके काळी भारताविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे संघटनेचे नेते टी मुइवाह यांनी नागांच्या वतीने या करारावर सही केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close