महिनाभराच्या दडीनंतर विदर्भात पावसाचं पुनरागमन

August 4, 2015 3:58 PM0 commentsViews:

rain in vidarbha

04 ऑगस्ट : गेल्या दीड महिन्यापासून अचानक गायब झालेल्या पावसाचं विदर्भात पुनरागमन झाले आहे. रात्रभरापासून विदर्भात सर्वदूर संततधार पाऊस पडत आहे.  मराठवाड्याच्या काही भागातही पावसाची रिपरिप सुरू आहे.

कोमेन चक्रीवादळामुळे झारखंड आणि छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचे पुनरागम झाले. विदर्भात रात्रभरापासून संततधार पाऊस पडत आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, गडचिरोली, वर्धा या भागातही चांगला पाऊस पडत आहे. विदर्भासह मराठवाडयाच्या काही भागातही पावसाने आज हजेरी लावली आहे. दुपारपासून पडणार्‍या या पावसाने शेतकरी सुखावला आहेत. सुकायला आलेल्या पिकाना नवसंजीवनी देण्याचे काम पाऊस करणार आहेत. त्यामुळे न उगवलेल्या बियाण्याच्या ठिकाणी लागवड करण्याचे काम शेतकर्‍यांनी हाती घेतले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close