मावळमध्ये मनसे तालुका अध्यक्षाचा गोळीबारात मृत्यू

August 4, 2015 5:02 PM0 commentsViews:

kamshed maval

04 ऑगस्ट : मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळूंज यांचा आज गोळीबारात मृत्यू झाला . राजकीय वैमनस्यातून त्यांच्यावर दुपारी 12च्या सुमारास हल्ला झाला होता. यानंतर कामशेतमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतल्या गावांमध्ये जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कामशेत गावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडचे कार्यकर्ते आमनेसामनेही आले होते. त्या पार्श्वभूमीवरच वाळूंच्या यांच्यावर आज अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला असल्याचं समजतंय. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्यानं ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ तळेगावच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, मंगेश वाळुंज यांच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने कामशेत इथल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान 4 वोटिंग मशीन फोडल्या.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close