ती ‘अस्वस्थ’ गर्दी !

August 4, 2015 7:01 PM35 commentsViews:

amit modak- अमित मोडक , सीनिअर प्रोड्युसर, आयबीएन लोकमत 

एक फाशी…तीही दहशतवाद्याला…शेकडो जीव घेणार्‍या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी केली नव्हती. पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती ‘ती’ गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दी, का जमली होती ती ‘गर्दी’? कल्याण, मुंब्रा, वांद्रे… मुंबईच्या अनेक भागातून लोक याकूबच्या अंत्ययात्रेसाठी का आले? हे सगळे विचार डोक्यात घोळत असतानाच मोबाईलची रिंगटोन वाजली… एका मित्राचा फोन होता. हॅलो म्हणायच्या आधी त्यानं भळाभळा बोलायला सुरुवात केली. बोल आता… सांग मला याकूब मेमन महात्मा होता का? त्याच्या अंत्यविधीला इतकी गर्दी? ही गर्दी म्हणजे भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. मी काही बोलण्याचा प्रयत्न करतच होतो, की तो परत बोलला, थांब आज माझं ऐक, ज्या न्यायाधीशांनी निर्णय दिला, ज्या पोलिसांनी जीवाचं रान करून तपास केला, ज्या वकिलांनी जीव धोक्यात घालून खटला लढवला. ही गर्दी म्हणजे त्या सगळ्यांचा अपमान आहे. त्याच्या आवाजात संताप होता. ही गर्दी मुंबई बॉम्बस्फोटात जीव गमावलेल्या प्रत्येक जीवाचा अपमान आहे. त्यांच्या नातेवाईकांचा अपमान आहे. हा अपमान भारतीय न्यायव्यवस्थेचा आहे. मी फक्त ऐकत होतो. काय बोलावं सुचत नव्हतं आणि तो बोलायचा थांबत नव्हता. मी बोललो होतो ना, मुस्लिमांना भारत मान्य नाही. ते स्वत:ला भारतीय समजत नाहीत. हा त्याचा पुरावा. मग माझाही पारा चढला, त्याला थांबवत बोललो, आता जरा अति होतंय. पण माझं वाक्य म्हणजे आगीत तेल ठरलं. तो आणखी संतापला, अति होतंय…अजूनही माझं बोलणं अति होतंय. मग ती गर्दी काय होती बोल?

एक दहशतवादी, बॉम्बस्फोट घडवतो, शेकडो जीव घेतो आणि त्याला दफन करण्यासाठी इतका मोठा जमाव येतो, हे अति नाही? अरे, तुमचे डोळे उघडणार की नाही? त्याचं बोलणं सुरू असताना मी मात्र स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. एक गोष्ट लक्षात आली. आता याला काहीही समजवण्यात अर्थ नव्हता. तो तावातावानं बोलत होता. मनात येईल ते तोंडात येईल ते… आणि मग अचानक म्हणाला, देशाची वाट लागल्यावर तुम्हाला जाग येईल एवढं बोलून फोन ठेवला. त्याचा राग शांत झाला की, मी काहीही बोलत नाही म्हणून वैतागून फोन ठेवला माहीत नाही.

yakub-mourners_647_073115113424
तो फोन मात्र मला अस्वस्थ करून गेला. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचा विचार करू लागलो. खरंच का जमला असेल एवढा मोठा जमाव? मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचं मुस्लिमांना दु:ख नाही का? मुंबईवरचा हल्ला फक्त हिंदूंपुरता मर्यादित होता का? मुंबईला झालेली जखम ही मुस्लिमांची नव्हती. की मग ती गर्दी समर्थन करत होती मुंबई बॉम्बस्फोटाचं…

याकूबच्या अंत्यविधीला त्याच्या नातेवाईकांनी येणं हे समजू शकतो. पण मुंबईच्या प्रत्येक भागातून मुस्लिमांनी एवढी गर्दी का केली? जमावबंदी झुगारून गर्दी वाढत होती. गर्दी एवढी होती की दोनवेळा प्रार्थना घ्यावी लागली. याकूब मेमनसाठी एवढी प्रार्थना का? या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नाहीय. पण त्या गर्दीनं खूप चुकीचा संदेश दिला एवढं नक्की. मुस्लीम समाजानं एक मोठी संधी गमावली असं सतत राहून-राहून वाटतंय. जर याकूबच्या अंत्यविधीसाठी गर्दी जमली नसती, तर एक कठोर संदेश गेला असता, की मुस्लीम समाज हा फक्त दहशतवादाचं समर्थन करत नाही तर अशा कृत्यात सहभागी असणार्‍यांना बहिष्कृत करतो.
दहशतवादाला मुस्लीम थारा देत नाही. असं घडलं असतं तर एक वेगळं वातावरण तयार झालं असतं. हिंदू-मुस्लीम ऐक्याला एक नवं बळ मिळालं असतं. कॉस्मोपॉलिटिन म्हणवणार्‍या मुंबईनं देशाला वेगळा संदेश दिला असता. कट्टर हिंदुत्ववाद्यांची तोंडं बंद झाली असती, अतिरेकी मुस्लिमांना कठोर संदेश गेला असता. ओवेसीसारख्या नेत्यांना चपराक बसली असती. पण दुदैर्वानं तसं झालं नाही आणि एक मोठी संधी गमावली. (संधी मुस्लिमांनी गमावली, तरी त्याचे परिणाम सगळ्यांवर होणार.)

31yakub-funeral1
‘त्या’ गर्दीमुळे पाकिस्तान आणि इतर भागात भारताविरुद्ध कट-कारस्थान करणार्‍या दहशतवादी शक्तींना नक्कीच बळ मिळालं असणार यात शंका नाही. आयसीससारख्या दहशतवादी संघटना, ज्यांच्या रडारवर भारत आहे, त्यांनाही बळ मिळालं असणार, कारण ‘अस्वस्थ’ मुस्लीम हेच या संघटनांचं बळ आहे आणि त्या गर्दीत प्रचंड अस्वस्थता होती. ‘त्या’ अस्वस्थ गर्दीतून नव्यानं याकूब, कसाब शोधण्याचा प्रयत्न होणार, या अस्वस्थतेचा वापर होणार (राजकीय आणि अतिरेकी), भारतीय समाजातली  झाकलेली अस्वस्थता उघड्यावर आली.  ‘त्या’ गर्दीतून जसं दहशतवादी संघटनांना बळ मिळेलं तसंच कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही. आता ‘ती’ गर्दी दाखवून ते परत भीती दाखवू शकतात. ‘त्या’ गर्दीवरून पुन्हा अस्वस्थ करणारे प्रश्न विचारू शकतात. माथी भडकवू शकतात. ‘ती’ गर्दी विश्वासाला धक्का देणारी होती? की मग पुन्हा अविश्वासाची बीज रोवणारी? ती गर्दी ‘ओवेसी’चा विजय होता? की मग हिंदू-मुस्लीम ऐक्य कमजोर होत असल्याचं द्योतक? ‘ती’ गर्दी अतिरेकी विचारधारेच्या प्रत्येक संघटनेच्या पथ्यावर पडणारी ठरली किंवा ठरू शकते. एक नक्की ‘ती’ गर्दी पराभव आहे भारतीय लोकशाही मूल्यांचा, ‘ती’ गर्दी पराभव आहे हिंदू-मुस्लीम ऐक्य जपणार्‍यांचा, पराभव आहे भारतीय समाजाला एकसंध ठेवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा.

BL31YAKUB_MEMON_2492101f
बाबरी मशिदीला उत्तर म्हणून मुंबई बॉम्बस्फोट, पडसाद म्हणून दंगल. हिंदू-मुस्लिमांमधल्या दुफळीची पार दरी झाली. राजकीय पक्ष…कट्टर धर्मांध संस्था यांनी ही दरी कधीही भरून निघणार नाही, याची काळजी घेतली आणि ती दरी भरून निघण्याऐवजी वाढत गेली. जखम भरण्याआधी नवे घाव देण्यात आले. नाहीतर मग जुन्या घावांच्या नव्या जखमा करण्यात आल्या. म्हणून तर हजारोंच्या गर्दीला याकूब जवळचा वाटला.

लालबागच्या गणपतीची आरती करणारे मुस्लीम, हाजीअलीच्या दर्ग्यावर हजारोंच्या संख्येनं जाणारे हिंदू… ईदच्या काळात मोहम्मद अली रोडवर मुस्लिमांच्या बरोबरीनं गर्दी करणारे हिंदू…पण यातली एकही गर्दी कधीही आपल्या नजरेत येत नाही. यातली कुठलीही गर्दी बघून विश्वास का निर्माण होत नाही की, धार्मिक एकात्मता अबाधित राहील? ही गर्दी का आश्वासक वाटत नाही? …आणि याकूबच्या अंत्ययात्रेला आलेली गर्दी का अविश्वास बीज पेरून जाते. हे न समजण्यासारखं. एक मात्र नक्की आहे.

मुंबई अस्वस्थ आहे. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर होती. तशीच आणि तितकीच अस्वस्थ… इतकी वर्षं दोन समाजांना एकत्र बांधण्याचे प्रयत्न एका झटक्यात शून्य करण्याची ताकद त्या ‘गर्दीत’ होती. ती ‘गर्दी’ अस्वस्थतेचं प्रतीक होती. ती ‘गर्दी’ सांगतेय सगळं काही आलबेल नाही. ती ‘गर्दी’ सांगतेय सामाजिक एकात्मता पुन्हा एकदा कमजोर होतेय. आता गरज आहे त्या ‘अस्वस्थ’तेला वेळीच समजून घेण्याची… नाहीतर या धुमसत्या ठिणगीची उद्या आग होऊ शकते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • suyog shetye

  Amit, really nice article….
  खूप छान लेख …। खरच विचार केला पाहिजे (मुस्लिमांनी , राजकीय नेत्यांनी आणि एकून सगळ्या समाजानेच ), नाहीतर वेळ निघून जाईल

 • Jayesh Patil

  तुम्ही ज्या काही भावना मांडल्या त्या बरोबरच पण काय करणार ते त्यांच्या रक्तात च आहे त्याला पर्याय नाही त्यांना काही फरकच नाही पडत आपले मेले काय आणि दुसरे मेले काय गुणधर्म नाही सोडत ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे…।

 • anand kalyankar

  aaply story vachli tyatun bhiti nirman karnyacha pryatn zalyasarkh wat to ya sagly sathi television sarkh madhyam jbabdar ahet karan tumi lokani apj abdul kalam sarkhya des baktala sodun etar thikani kay chalaly nagpua ani mahim yatch adkun ghetl hot.

 • dattatray pawar

  सर्वसामान्याच्या मनातील भावना मांडली आहे ह्या लेखातून … अति उत्तम … छ्यान … हि बाब सर्व धर्मिय लोकांना लवकर कळली तर?

 • http://www.rameshwarsanstha.com/ Rameshwar Nare

  nice article

 • sudhir

  khar ,mhanje muslim dharmatach sangitale ahe ki tyana muslimashivay iter dharm manya nahit pan he suntha kelelya so purogami netyana kon samjavinar

 • sagar tate

  गरज आहे त्या ‘अस्वस्थ’तेला वेळीच समजून घेण्याची… नाहीतर या धुमसत्या ठिणगीची उद्या आग होऊ शकते.

 • Amar More

  VERY NICE ARTILE… मुंबई अस्वस्थ आहे.

 • Raju Sathe

  vichar karayala lavnara lekh…

 • Dhananjay P Kuwar

  I think it is not the crowd which is bothering me. What bothers me more that so called literate Media houses, News papers and all those who signed the mercy petition of that terrorist are to be blamed. The channels made it a big news. The News papers printed 12 pages for that terror planner. The Media houses and the news papers were in competition to glorify his act of Terror. Who says that the gap is widening?
  You are saying it. You played dirty. Why those so called national dailies printed Sir A.P.J. Abdul Kalam’s funeral news on the 13th page? Oh yes because he devoted his life for this nation. Every single citizen of India, irrespective of cast and religion salutes Sir Kalam. His religion does not matter his patriotism made it so large that we are proud to say that we were born in the era of a Missile Man.
  You go to a common muslim man and ask him that how much it has impacted his daily routine, after the hanging of that terrorist, who planned it so well that it led to killing of 100s of innocent individuals, their families and created a question for their future.
  But you media people, you want your TRP’s to go up, your subscriptions to go up because a Terrorist is going to increase your sale you are ready to go to any extent.
  Even if the Terrorist kills your relatives or even your parents, you will say oh by mistake he killed them. Wake up people!
  In the name of freedom to speech you have gone far to a point of no return and now you will keep defending your so called journalism although you know you are wrong.
  I dare you to do the same kind of News coverage in Pakistan, your favourite country, who sponsors these acts of terrorisms in my Nation and creates your TRP & Subscription Heros.
  But we all know that you have to be a MAN enough to take this challenge.

 • ASHOK S. JADHAV

  जे मुसलमान जो माणूस लोकशाही उध्वस्त कर नार्‍या टोळीला मदत त्यामधे सामील होऊन हजारो निरपराध मुस्लिम, हिंदू इतर लोक त्या बॉम्ब स्पोटा त मारले गेले ? त्या न रा धमाच्या मयताच्या मिरवणुकीला गेले ?? त्या सर्व लोकांनी स्वतला प्रश्न विचारावा ?? हे चुक की बरोबर ???

 • Pravin Sonawane

  Amit sir tumche manapasun abhindan karan eka tari patrkara he chukiche vatle ani to bolala yache mala kutuk vatle trivar tumche abhindan. hach asontasoh prtekachya manat aahe. media ne ya asontochvar bolale pahije but ase hotana kahi disat nahi. media la ya sathi vel nasel karan tyancha vel yakub var documentry karnyat gela. media ne samnya nagrikachi baju ghene sodle aahe sagala trf ch khel suru aahe. mazya samnya nagrikala konta celebrity kay bolala yat kahi intrest nasto. tynchya news karun tyana mothe karnya peksha amhla he sanga amche PM kay bollae Amche CM kay bolale faltuchya lokanche matachi news banun tyana mothe karnya peksha tyana ignore karne media ne shikhave. evdich icha. ani amit siranche parat ekda abhindan. hats of you.

 • MOIZ SITARI

  amitji lekh khup changla vishleshan kartana ajmal kasab aafzal guru cha visar zala ahey kasab va guru babat bharti muslim azwaz kauthvila nahi? yakub baabt muslim ka jamle //? YA CHA VISHLESHAN HONE GARJE CHE AHEY

 • Vinay Ghoman

  Hyala Jababdar Kahi Anshi Prasar madyama pan ahet. Ka tyani ya vish okanarya Ovesi, MiM ani Abu Azami ya sarkhya so called netyanna Highlite kela, Ka tyanche bytes sarakhe dakhavale gele ani tyavar chahrcha ghadvun analya. Yakub la hero karnyat Prasar Madhyammancha motha hat ahe, AItihasik Fashi Mhanun hya fashila sanbhodnyat yet hota. Are yakub ha deshdrohi terrorist hota. Mag tyachi Fashi hi Aitihasik kashi. Yamulech muslim lokanchya manat tyachyabaddal sahanbhuti nirman zali.
  MIM, Ovesi, Congress, Samajvadi paksha hyanchya pekshahi Prasarmadhyammana mi Jasta Dosh deil. Mediani ni jasta mane dubhangavanyacha prasar kela ahe. Abdul Kalaman peksha Yakub la jast highlight kela Gele. Prasarmadhyammavarach ata nirbandha ananyachi vel ali ahe. Apala TRP vadhavanyachya nadat atyanta bejabdar pane vagali Media.
  Lokshahicha choutha stanbh mhanavnari Media evadhi bejajabar pane kashi vagali. Konachya sanganyavarun. Ha ata vicharkarnyasarkha prashna ahe. Shame to Politishians & Media,

 • Nishikant

  No Mr. Vinay you are fundamentally wrong, if Sanjay Dutt was hanged then the people in the crowd would be his fans for his film roles not the supporter of his action against the nation,Here Yakub Memon was hanged for the reason punishable by law and he was not famous for his any philanthropic actions.

  • Vinay Trivedi

   Here Muslim people see him as person in their community. Or may be they were feeling about always Muslim Person get targeted by Religious Party who have the power.

 • Prakash Nar

  हिंदू मिस्लीम ऐक्य हे फक्त बोलायला चांगले आहे परंतु या देशात जो पर्यंत
  जातीपातीचे राजकारण राहणार तोपर्यंत हे असेच चालणार ज्या दिवशी धर्म संपेल
  त्यादिवशीच हिंदू मुस्लिम ऐक्य शक्य आहे आणि ते कधीही होणे अशक्य

 • Bala Khade

  एवढा मोठा लेख!!!!! अहो, याला संपूर्णपणे media जबाबदार आहे, याचा कुठे लेखात उल्लेखच नाही.

 • Nandkishor Bharat Bhoir

  IT IS A MESSAGE THAT RELIGIOUS LEADERS CAN DISTURB YOUR INTEGRITY. EITHER / OR

 • Jai Maharashtra

  The Inconvenient Truth..

 • Jai Maharashtra

  हे सगळ बघून, बाबू बजरंगी, माया कोडनानी ला उद्या फाशी दिली तर त्यांचा अन्त यात्रे साठी लाखो हिंदू एकत्र आले त आश्चर्य वाटू नये. .

 • kuldeep singh

  Lek

  lihnaryala agodar nahi samjle ka apan Yakub Meman la Star sarkhi vagnuk detoy.
  tyacha pratek minitala to kay kartoy kay nahi yacha hishob denarya midea la tevha nahi kalale ka??? ata Aswsthtecha dhong antay.

 • Atul Nirmale

  कलामांना हाइलाइट केले असते तर काय झाल असत ?

  त्याच कारन अस की

  कलामांच्या गर्दीला कट्टर हिंदुंशक्तींनी हजेरी लअवलेली ऐक्याच चित्र दिसत होत हे जर लोकांना दिसला असत तर

  देशभक्ति बळकट झाली असती .हे दाखावन्याची चूक मिडिया ने जाणून बुजुन केलि आणि वाढलेली दरी आनाखिण वाढवली!!!

 • Atul Nirmale

  असंतोशाला कारण आहे मीडिया!!

 • Atul Nirmale

  देश द्रोही तो देशद्रोहिच असतो

  आणि हिन्दू जार कट्टर असते तर फाळणी नंतर एक ही मुस्लिम दिसला नसता.
  ही दरी संपवन्य साथी तुम्ही के केले?

  फ़क्त TRP वाढवला !!!
  तुम्ही जबाबदार आहात या सर्व घटनेला

  टीव्ही वर बड़बड़ करायची नव नविन अक्लेचे तारे तोडून नासके विचार लोकां समोर मंदयचे चर्चेला बोलावून त्यांच्यातल वाद मितवन्यच प्रयत्न करण्या ऐवजी अधिक भांडने लावयची आणि लोकांच्या मनातील दरी आणिद्वेष वाढवायचे.बास इतकेच करा!!!

 • Jatin Narvekar

  अंतविधी तुरंगात न केल्याने हि अस्वस्तता (जी आपण इतके दिवस असून हि स्वीकार करत नवतो किंबहुना आपल्या ला हा मानसिक रोगच आहे ) जाणवली का?

 • Samshordin Desai

  moiz sitari cha comment sarvani watcha ani fakt jarasa vichar kara

 • Amit Modak

  मित्रांनो हा लेख लिहण्यामागे माझा उद्देश वेगळा होता. मला वाटतं की, आता वेळ आली आहे की सामान्य माणसांनी पुढे होऊन ( हिंदू आणि मुस्लीम ) अशा विषयांवर मतं मांडायला हवी. आणि नेमकं काय अडचण आहे ते समजून घेतलं पाहिजे

 • Prasad Korgaonkar

  देश द्रोही तो देशद्रोहिच असतो आणि हिन्दू जार कट्टर असते तर फाळणी नंतर एक ही मुस्लिम दिसला नसता.ही दरी संपवन्य साथी तुम्ही के केले?कलामांना हाइलाइट केले असते तर काय झाल असत ?
  त्याच कारन अस की, कलामांच्या गर्दीला कट्टर हिंदुंशक्तींनी हजेरी लअवलेली ऐक्याच चित्र दिसत होत हे जर लोकांना दिसला असत तर देशभक्ति बळकट झाली असती.हिंदू मिस्लीम ऐक्य हे फक्त बोलायला चांगले आहे परंतु या देशात जो पर्यंत जातीपातीचे राजकारण राहणार तोपर्यंत हे असेच चालणार ज्या दिवशी धर्म संपेल,त्यादिवशीच हिंदू मुस्लिम ऐक्य शक्य आहे

 • Umesh Ambre

  NIce Amit .Tumhi khup vegala vichar karayla lavnara lekh lihilay kharach grate.ani kharach attach ti vel ahe swataha samjun gheun shakyato sarvanna sangnyachi ki apla fakta ekch dharma ahe manavata ani hach dharma vadhayla hawa..

 • Ashish Pethkar

  Mala watata aaplya bhartat khupach jast sut dilya jatey (pratyek babtit).
  aatankwadyala sut (biryani), gunhegarala payroll (Sanjay dutta – Salman)
  bhrshtacharyala mantripad (aani mantripadasathi pn bhrshtachar)

  mala kharach watata ki aapli nyay vyavastha khup balkat whayla havi

  Justice Delayed is Justice Denied

  aani media la pn nyay vyavasthene fatkarla pahije ki tumhi janatela kay dakhwhayla have kimbahuna kay dakhwayla nako.

 • Kamlakar Chaudhari

  हि गर्दी पाहून मिडिया ने आत्म परीक्षण करण्यची गरज आहे. भारताच्या संविधानात मिडिया साठी काही नवीन सुधारणा कराव्या लागल्यास आश्चर्य वाटणार नाही.मिडिया ला दिले गेलेले स्वतंत्र हे माकडाच्या हाती दिलेल्या कोलीता सारखे आहे.

 • Bhupesh ghule

  chan lekh ahe sir vichar kraychi gosta ahe.

 • Ashvini Shinde

  lekh changala ahe…pan tumhi manya ka nahi karat k deshamadhe hindu muslim waad wadhavanyamadhe tumhi pan sahabhagi ahat te…

 • Ashvini Shinde

  tumhi deshat je changal ghadat ahe te pan dakhavu shakta k…kon hota to yakub….ek terrorist….mag tyala itak famous karaychi garaj kay..??

close