कळणे मायनिंगच्या कामाला सावंतवाडी कोर्टाची स्थगिती

December 11, 2009 10:40 AM0 commentsViews: 4

11 डिसेंबर कळणे मायनिंगच्या कामाला सावंतवाडी कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. कळणे मायनिंगमधील सर्व्हे नंबर 7 आणि हिस्सा नंबर 2 यातील हिस्सेदार सत्यवती देसाई यांनी घेतलेल्या आक्षेपावर न्यायालयाने हा अंतरीम आदेश दिला आहे. कळणे मायनिंगच्या संचालकांपैकी एक संचालक विनय रोहिदास पाटील यांना 7 जानेवारी 2010 पर्यंत याबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने सांगितलं आहे. तोपर्यंत मायनिंगचं काम बंद ठेवावं असा आदेशही कोर्टाने जारी केला आहे. कळणे मायनिंगचे संचालक विनय पाटील हे काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचे चिरंजीव आहेत.

close