नवी मुंबईत दोन स्कूल बसेसची टक्कर

December 11, 2009 10:45 AM0 commentsViews: 6

11 डिसेंबर नवी मुंबईतल्या पाम बीचवर दोन स्कूल बसची टक्कर होऊन 8 विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. जखमी विद्यार्थ्यांवर वाशीतल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पाम बीच रोडवर नेरुळजवळ सकाळी हा अपघात झाला. या स्कूल बसेस दिल्ली पब्लिक स्कूल आणि 7 डेज स्कूल या दोन शाळेच्या आहेत. दोन्ही बसच्या ड्रायव्हर्सना अटक करण्यात आली आहे. नेरुळमधले नगरसेवक संतोष शेट्टी यांचीही यात एक बस आहे.

close