थकलेल्या आईची कहाणी…

August 5, 2015 8:47 AM0 commentsViews:

05 ऑगस्ट : ज्या आईनं जन्म दिला, तिला म्हातारपणी सांभाळणं जड झालं म्हणून चक्क वार्‍यावर सोडून देण्यात आलंय. हंसा राजपूत असं या 85 वर्षांच्या महिलेचं नाव आहे आणि मुंबईत हा संतापजनक प्रकार घडलाय. आयुर्वेदिक डॉ. निरंजन पटेल यांना बॉम्बे हॉस्पिटलजवळ अगदी कृश झालेल्या अवस्थेत पावसात भिजताना हंसा दिसल्या आणि त्यांनी हंसा यांना जी.टी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

80 yrs ajji

हंसां यांचे कुटुंबीय एका मोठ्या गाडीतून आले आणि त्यांना रस्त्यावर बेवारस सोडून निघून गेले, अशी माहिती रस्त्यावर बसणार्‍या लोकांनी डॉक्टर निरंजन यांना दिली. हंसा यांच्यावर जी. टी. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी आज हंसा यांची भेट घेतली. पण प्रश्न आहे त्यांच्या भवितव्याचा… कारण हंसा यांच्या मुलाचा पत्ता लागलेला नाही आणि वृद्धाश्रमाचा खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे तिथे त्यांना पाठवणं आपल्याला शक्य नाही, असं डॉक्टर निरंजन यांनी सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close