6 महिन्यात समुद्राचं पाणी गोडं करण्याची प्रक्रिया सुरु – मुख्यमंत्री

December 11, 2009 10:47 AM0 commentsViews: 6

11 डिसेंबर समुद्राचं पाणी गोडं करण्यासंदर्भात सहा महिन्यात प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. मुंबईत ज्या प्रकल्पांना रोज दोन लाख लिटरपेक्षा जास्त पाणी लागतं त्या प्रकल्पांना मध्य वैतरणा धरण पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा करण्याचं धोरण राबवलं जात असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईच्या पाणी प्रश्नावर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना चव्हाण यांनी ही माहिती दिली. तसेच यापुढे पाण्याचंही ऑडिट करण्याच्या सूचनेचा विचार करु असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुंबईतल्या टॉवर्सचं बांधकाम आणि स्विमिंग पूलसाठी पाणी देण्यास महापालिकेने यापूर्वीच बंदी घातल्याचंही त्यांनी सागितलं.

close