पंतप्रधानांची आंध्र प्रदेशातल्या खासदारांशी चर्चा

December 11, 2009 12:25 PM0 commentsViews: 2

11 डिसेंबर तेलंगणाला विरोध असणार्‍या खासदारांची पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भेट घेतली. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी खासदारांना दिलं. दुसरीकडे हैदराबादमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी तेलंगणाचा ठराव विधानसभेत मांडण्यासाठी कोणतीही तारीख अजून निश्चित केली नाही. या मुद्द्यावर एकमत बनवण्यासाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करण्याच्या विचारात आहे. तेलंगणाच्या विरोधात आंध्र प्रदेशातल्या 294 पैकी 128 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात आणि रायलसीमात यावरून हिंसाचार सुरू आहे. स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय सरकारने जाहीर केला. पण तेलंगणा राज्य इतक्यातच अस्तित्वात येण्याची शक्यता नाही.

close