दिल्लीत अतिरेक्यांची घुसखोरी ?, हाय अलर्ट जारी

August 5, 2015 5:18 PM0 commentsViews:

delhi terr attack05 ऑगस्ट : उधमपूरमध्ये बीएसएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आलाय. राजधानी दिल्लीत घातपात घडवण्यासाठी अतिरेकी दाखल झाल्याची माहिती मिळालीये. गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीनुसार. अतिरेकी अत्याधुनिक शस्त्रास्त्रंसह दिल्ली दाखल झाले आहे.

एका अहवालानुसार, अतिरेक्यांकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा असून त्यात आरडीएक्स आणि डिटोनेटरचा समावेश आहे. गुप्तचर यंत्रणेनं दिल्लीत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. येत्या 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन अतिरेकी घातपात घडवण्याच्या इराद्याने अतिरेकी दाखल झाले असावे अशी भीती व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात गुरदासपूरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दिल्ली पोलीस आणि सीआईएसएफसह गुप्तचर यंत्रणेनं सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close