नारायण राणे यांचा माफी मागण्यास नकार

December 11, 2009 1:10 PM0 commentsViews: 7

11 डिसेंबर नारायण राणे यांनी दारुबंदी संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. विदर्भात होणार्‍या आत्महत्यांमागे दारु हे एक कारण आहे, त्यामुळे विदर्भात दारुबंदी करा असं पत्र महसूलमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना बुधवारी लिहीलं होतं. पण राणेंच्या या पत्रामुळे विदर्भातल्या शेतकर्‍यांचा अपमान झाला. त्यामुळे राणे यांनी शेतकर्‍यांची माफी मागावी यासाठी शुक्रवारी विधानसभेत पुन्हा घोषणाबाजी झाली. शिवसेना आमदारांच्या गदारोळामुळे कामकाज बर्‍याचदा तहकूब करावं लागलं. गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचं लग्न असल्याने सभागृहात उपस्थिती कमीच होती. भाजपाचे बहुसंख्य आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेलाच राणेंच्या विरोधात किल्ला लढवावा लागला. राणेंनी विरोधकांना दाद तर दिली नाहीच, मात्र विरोधकांमध्येच समन्वय नसल्याचं सांगितलं. त्यातच विरोधी पक्षनेतेही अनुपस्थित असल्यामुळे सेनेच्या आंदोलनाला धारच नव्हती. अखेर उत्तर मिळत नाही, हे बघितल्यावर सेना आमदारांनी सभात्याग करुन निषेध नोंदवला.

close