असा पकडला दुसरा कसाब !

August 5, 2015 6:32 PM0 commentsViews:

05 ऑगस्ट : मंुबईवर झालेल्या 26\11 च्या दशहतवादी हल्ल्यातील यमसदनी पोहचलेल्या अजमल कसाबनंतर दुसरा जिवंत अतिरेकी भारताच्या तावडीत सापडलाय. उस्मान उर्फ कासिम खान असं या दुसर्‍या ‘कसाब’चं नाव आहे. या उदमपूरमधील नरसूजवळील भागात राहणार्‍या 5 गावकर्‍यांनी जीवाची बाजी लावून या उस्मानला पकडून दिलं. udampur_34345

उस्मान आणि त्याच्या साथीदाराने बीएसएफच्या ताफ्यावर गोळीबार करून पळ काढला. उस्मानने एका गावकर्‍यावर रायफल रोखून पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातील त्याने मला चूपचाप जाऊ द्या, बीएसएफच्या जवानांपासून मला वाचवा मी तुम्हाला नुकसान पोहचवणार नाही अशी याचना केली.

पण त्याने रायफल रोखून धरल्यामुळे त्याच्यासोबत चालण्याशिवाय गावकर्‍यांना पर्याय नव्हता. उस्मानने पाच गावकर्‍यांना ओलीस ठेवलं होतं. पुढे काही अंतर पार केल्यानंतर त्यातील दोघांनी धाडस दाखवून त्याच्याकडची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. उस्माननेही जोरदार प्रतिकार केला. त्याने गावकर्‍यांवरच हल्ला केला. एवढंच नाहीतर या झटापटीत गोळीबारही झाला. एक गोळी एका गावकर्‍याला जवळून चाटून गेली. तेवढ्यात पोलीस आणि बीएसएफच्या जवान तिथे पोहचले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close