डॉक्टर कोटणीस यांच्या कार्याचा चीनकडून गौरव

December 11, 2009 1:23 PM0 commentsViews: 3

11 डिसेंबर भारत-चीन दरम्यान मानवतेचा पूल निर्माण करणारे भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा चीनच्या जनतेना पुन्हा एकदा गौरव केला आहे. गेल्या 100 वर्षात चीनच्या विकासात योगदान देणार्‍या 10 परदेशी नागरिकांचा चीननं गौरव केला. यामध्ये डॉ. कोटणीस यांचं नाव अग्रक्रमावर आहे. ही 10 नावं निवडण्यासाठी चीनने देशभरात सर्व्हे केला. चीनच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त चीन रेडिओने केलेल्या इंटरनेट सर्व्हेत लाखो चीनी नागरिकांनी मतं नोंदवली. सोलापुरात जन्मलेल्या डॉ. कोटणीसांनी दुसर्‍या महायुद्धात चीनमध्ये वैद्यकीय सेवा केली होती. त्यामुळे चिनी जनतेत त्यांना आदराचं स्थान आहे. चीनमध्ये डॉ. कोटणीस यांची तीन स्मारकं उभारली आहेत. पण दुर्देव म्हणजे त्यांचं सोलापुरातलं स्मारक गेली कित्येक वर्षे रखडलंय. गेली 10 वर्षे या स्मारकाच्या उभारणीचं काम सुरू आहे.

close