नागपूरमध्ये सीबीआयच्या ऑफिसला आग, महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक

August 5, 2015 8:23 PM0 commentsViews:

nagpur_cbi3405 ऑगस्ट : नागपूरच्या सेमिनरी हिल्स परिसरातील सीबीआयच्या ऑफिसला सकाळी आग लागल्यामुळे महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. सीजीओ कॉम्लेक्स मधील तिसर्‍या मजल्यावरील सीबीआयच्या ऑफिसमध्ये ही आग अपघात आहे की घातपात याचा तपास नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून सुरू झाला आहे.

या आगीत सीबीआयच्या फाईल्स ठेवण्याचा विभाग जळाला आहे. ही आग सकाळी शॉर्टसर्किटने लागल्याची सुरक्षारक्षकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली असं क्राईम ब्रांचकडून सांगण्यात आलं.

गुजरात मधील इशरत जँहा इनकाऊंटर प्रकरणाचा तपासही नागपूरच्या याच सीबीआय कार्यालयातून सुरू आहे. विशेष म्हणजे नागपूर सीबीआय ज्या प्रकरणांचा तपास करत होतं त्या प्रकरणांच्या फाईल्स ज्या रूममध्ये ठेवल्या होत्या. त्या रूमला ही आग लागली. पण, महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणांच्या फाईल्स याच ऑफिसमधल्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, त्या सुरक्षित आहे, असं सीबीआयच्या अधिकार्‍यांनी सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close