आर्वीतल्या पूरग्रस्तांचं 10 महिन्यात करणार पुनर्वसन – नारायण राणे

December 11, 2009 1:25 PM0 commentsViews: 1

11 डिसेंबर आर्वी विषप्राशन प्रकरणी 10 महिन्यात संबंधित पूरग्रस्तांचं पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन महसूलमंत्री नारायण राणे यांनी दिलं आहे. तसंच पूरग्रस्तांना सर्व पायाभूत सुविधा, भूखंड, नोकर्‍या दिल्या जातील असंही ते म्हणाले. विषप्राशन केलेल्यांमध्ये एकच जण पूरग्रस्त होता बाकीचे प्रहारचे कार्यकर्ते असल्याची माहितीही राणेंनी दिली. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी सामूहिक विष प्राशन आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधल होतं.

close