लुईस बर्जर घोटाळा : गोव्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाओ यांना अटक

August 6, 2015 9:06 AM0 commentsViews:

Churchill Alemao

06 ऑगस्ट :  गोव्यात गाजत असलेल्या लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणात गोवा क्राईम ब्रांचने पहिली आणि सर्वात मोठी कारवाई केली आहे. गोव्याचे माजी सार्वजनीक बांधकाम मंत्री चर्चिल अलेमाओंना क्राईम ब्रांचने अटक केली आहे. काल (बुधवारी) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

गोव्यातील पाईपलाईन प्रकल्पासाठी अमेरिकन कंपनी लुईस बर्जरने गोव्यातील एका मंत्र्याला लाच दिल्याचा आरोप होतं होता. या प्रकरणात चर्चिल अलेमाओ आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच नावही पुढे आलं होतं.

दरम्यान, दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या याचिकेवर 7 ऑगस्टरोजी सुनावणी होणार आहे.

काय आहे लुई बर्जर लाच प्रकरण :

 • जपान सरकारच्या कर्जपुरवठ्यातून गोव्यात 1031.90 कोटींचा पाणीपुरवठा आणि मलनि:सारण प्रकल्प
 • लुई बर्जर ही अमेरिकन कंपनी प्रकल्पाची मुख्य ठेकेदार
 • 14 सप्टेंबर 2007 ला भारत सरकार, गोवा सरकार आणि जपान सरकार यांच्यात प्रकल्पासंबंधी करार
 • जून 2009 ला लुई बर्जर या कंपनीची ठेकेदार म्हणून नियुक्ती
 • जानेवारी 2011 ला तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि तत्कालीन सार्व. बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय प्रकल्प देखरेख समिती स्थापन
 • 18 जुलै 2015 ला अमेरिकेतील एका खटल्यात लुई बर्जर कंपनीच्या 2 वरिष्ठ अधिकार्‍यांची कामत आणि आलेमाव यांना 6 कोटींची लाच दिल्याची कबुली.
 • 28 जुलै 2015 : प्रकल्पाचे संचालक आनंद वाचासुंदर यांना गोवा क्राईम ब्रँचकडून अटक
 • 29-30 जुलै 2015 : चर्चिल आलेमाव आणि दिगंबर कामत यांची लाचखोरी प्रकरणी क्राईम ब्रँचकडून कसून चौकशी
 •  3 ऑगस्ट 2015 : लुई बर्जर कंपनीचे माजी उपाध्यक्ष सत्यप्रकाश मोहंती यांना क्राईम ब्रँचकडून अटक
 •  4 ऑगस्ट 2015 : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामिनासाठी स्पेशल कोर्टाकडे अर्ज, अर्जावर 7 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी
 • 5 ऑगस्ट 2015 : रात्री उशिरा चर्चिल आलेमाव यांना त्यांच्या वार्का इथल्या निवासस्थानी क्राईम ब्रँचने केली अटक

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close