तेलंगणा देता मग बेळगाव का नाही : उद्धव ठाकरेंचा सवाल

December 11, 2009 1:57 PM0 commentsViews: 6

11 डिसेंबरतेलंगणा देता, मग बेळगाव का देत नाही असा सवाल करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सीमा प्रश्नाला हात घातला आहे. केंद्र सरकारने तेलंगणा राज्याच्या निर्मितीला मान्यता दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नसल्याचं त्यांनी काढलेल्या पत्रात म्हटलं आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीलाही त्यांनी विरोध केला आहे. शिवसेना असेपर्यंत महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा कोणी विचारही करू नये असं त्यांनी म्हटलं आहे. बेळगाव, कारवार, निपाणी हा सीमाभाग महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

close