लोकल ट्रेनचा जीवघेणा प्रवास, ओव्हरहेड वायरला चिकटून प्रवाशी जळून खाक

August 6, 2015 10:08 AM0 commentsViews:

06 ऑगस्ट : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्टेशनवर काल (बुधवारी) लोकल ट्रेनच्या टपावरुन प्रवास करताना एक प्रवासी ओव्हर हेड वायरला चिटकला. करंट लागल्याने तो प्रवासी जागेवरच जळून मृत्यूमुखी पडला. या व्हिडिओतील हे दृश्य आपणास विचलीत करु शकते. पण आयबीएन लोकमतच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन करतो की टपावरून प्रवास करून आपला जिव धोक्यात घालू नका.

charni road accident

लोकल ट्रेनमधून रोज जवळपास 75 लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य हार्बर पश्चिम मार्गावरुन जाणार्‍या लोकल रेल्वे गाड्या सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या असतात. त्यामुळे नाईलाजाने काही प्रवासी लोकल रेल्वेच्या दरवाज्यात लटकून प्रवास करतात तर काही तरुण स्टंट म्हणून रेल्वेच्या टपावरुन प्रवास करतात. त्यामुळे या जिवघेण्या रेल्वे प्रवासात अनेक अपघात होऊन नागरिकांचा जीव जातो.

बहुतांश प्रवाशांना कायमचे अपंगत्वही येते. आता तर रेल्वेने प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि लोकल जलद धावाव्यात म्हणून डीसी इलेक्ट्रीकचे एसी इलेक्ट्रीकमध्ये परिवर्तन केले आहे. त्यामुळे सध्या हेड वायरमध्ये 25 हजार व्होल्ट करंट असतो. लोकल ट्रेनच्या टपावरुन कोणी प्रवास करू नये, असे संगितले जाते. मात्र, तरीही काही प्रवासी टपावरुन स्टंट करत आपला जिवाशी खेळताना दिसतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close