श्रीसंतला H1N1 ची लागण

December 12, 2009 8:56 AM0 commentsViews: 1

12 डिसेंबर भारताचा क्रिकेटर श्रीसंतला H1N1 झाल्याचं टीम मॅनेजमेंटनं सांगितलं आहे. श्रीसंतला चंदिगडमधल्या फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर विकास भुतानी यांनी त्याच्यावर उपचार केले. H1N1 ची लक्षण दिसून आल्यानंतर त्याला टॅम्बिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. श्रीसंतला एक आठवड्याच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसंच गौतम गंभीरचीही H1N1 ची तपासणी करण्यात आली. गंभीरच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी विजय हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहेत. टीम इंडियाचे टीम मॅनेजर मयंक पारेख यांच्यातही H1N1 ची लक्षणं आढळली आहेत.

close