पळालेल्या भोंदूबाबांचा शोध सुरू

August 6, 2015 4:13 PM0 commentsViews:

vikramgad4406 ऑगस्ट : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात पोलिसांनी बुधवारी भोंदूबाबांच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय पण फरार असलेल्या भोंदूबाबांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईत मानवी कवट्या, एक मानवी सांगाडा, अशी अघोरी सामग्री सापडली होती.

विक्रमगड इथल्या साखरा गावातल्या जंगलात पैशांचा पाऊस पाडण्याचा भोंदूबाबांचा कार्यक्रम होता. त्यासाठी मंडपही उभारण्यात आला होता. या कार्यक्रमात 25 ते 30 भोंदूबाबा होते. या कार्यक्रमावर विक्रमगड पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांना दहा मानवी कवट्या, एक मानवी सांगडा, पुरल्यानंतर बाहेर काढलेला मृतदेह, हजार, पाचशे, शंभरच्या नकली नोटा, त्यासाठी लागणारा कागद जप्त करण्यात आला. तसंच तलवारी, जिंवत काडतूस असा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. या प्रकरणात सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. भोंदूबाबांनी मानवी सांगाडे कुणाचे आहेत याचा तपास सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close