राधे माँ भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत, लुकआऊट नोटीस जारी

August 6, 2015 5:46 PM0 commentsViews:

radhe maa06 ऑगस्ट : स्वता:ला देवीचा अवतार समजणार्‍या राधे माँ कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केलीये. राधे माँ दिसल्याक्षणी ताब्यात घेण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहे.

आपल्या पेहरावानं, विचित्र वागण्यानं कायम चर्चेत राहणारी राधे माँ आता पुन्हा एकदा नव्यानं वादाच्या भोवर्‍यात सापडली. मुंबईतील बोरिवली भागात राहणार्‍या निक्की गुप्ता या महिलेनं तिच्याविरोधात हुंडा मागणं, मारहाण आणि शिविगाळ केल्याचे आरोप केले आहेत. कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात तक्रारही दाखल झाली आहे. राधे माँ सोबत एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सध्या या राधे माँच्या शोधात जंग जंग पछाडत आहे. याशिवाय सूत्रांच्या माहितीनुसार राधे माँवर ईडीचीही नजर आहे. राधे माँ च्या ‘माता की चौकी’ वर तिच्या तथाकथित भक्तांकडून कोट्यवधींचं दान केलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार तिची संपत्ती अकराशे कोटींपर्यंत आहे. राधे माँ देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची पोलिसांना कुणकुण लागलीये त्यामुळे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close