सेना पदाधिकार्‍यांना अटक केली म्हणून पोलिसावर बदलीची कुर्‍हाड

August 6, 2015 6:18 PM0 commentsViews:

yavatmal306 ऑगस्ट : आठ महिन्यांच्या आतच फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्याची वादग्रस्त प्रकरणं पुढं येत आहेत. यामध्ये आत शिवसेनेच्या मंत्र्यांचं नाव पण समोर येत आहे. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल कराल तर काय होते, याचा नमूना एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतोय. या क्लिपमध्ये कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का केले असा जाब विचार प्रामाणिक पोलीस अधिकार्‍याची बदली करण्यात आलीये.

काही दिवसांपूर्वी घाटंजी इथं वनविभागाच्या अधिकार्‍याला मारहाण करण्याच्या आरोपावरुन तिथल्या पोलीस निरीक्षकाने दोन शिवसेना पदाधिकार्‍यांना अटक केली, त्यानंतर राजकीय दबाव वापरत, या प्रामाणिक पोलीस निरीक्षकाची थेट बदलीच झाली. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर या पोलीस अधिकार्‍याला जिल्हाबाहेर हाकलण्याचा प्रयत्नही सुरू आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये एक हवालदील एसपी अखिलेश सिंह आणि पोलीस निरीक्षक भरत कांबळे यांच्यातला हा संवाद…

एसपी – दुसरं असं कांबळे, तुमचं पालकमंत्र्यांशी काही बोलणं झालं का, पालकमंत्र्यांकडून काही इन्डिकेटर्स मिळालेत का?

पोलीस निरीक्षक – नाही सर, काही नाही.

एसपी- ते एकदम मागे लागलेत. तुम्हाला हे नको करायला पाहिजे होतं, विषय संपत होता. आम्ही घेत होतो ना जबाबदारी, विषय संपत होता, कसं काय तुम्ही लोकांनी ऍडव्हान्स कारवाई कशाला केली?

एसपी- त्यांच्या काही असणार, त्याचं असं सुरू आहे., की तुम्हाला बाहेरच पाठवायचं…तुम्हाला अगोदरच माहिती देतो, तुम्ही बघा कसा पाठपुरावा करतो,. तुमचं काही नुकसान होवू नये..आयजी साहेबांकडून आम्हाला विचारणा झाली आहे.

पोलीस निरीक्षक – त्यांच्याशी कोणताही पंगा घेतलेला नाही, स्टेटमेंट घेतले होते

एसपी – तुम्हाला या जिल्ह्यात किती वर्षे झालेत ?

पोलीस निरीक्षक – दोन वर्षे झालीत

एसपी – दोन वर्षे एवढा अवधी नाही..त्यांना एवढा मागे लागून जिल्ह्यात राहू द्यायचं नाही, बाहेर पाठवायचं चुकीच आहे ना

पोलीस निरीक्षक – सर, मात्र माझी काय चुकी आहे

एसपी – नाही, ऐकुण घ्या. चूक तेवढीच, तुम्ही आणखी काळजी घ्यायला हवी होती, त्याचं ऐलिगेशन तेच आहे,आमच्या कार्यकर्त्याविरुद्ध हे मागे लागलेत, हे अमुक ठमूक आहे.

पोलीस निरीक्षक – आता कार्यकर्ते वगैरै फिरताहेत ,आम्ही एका शब्दानं विचारत नाही

एसपी – तेच आहे. विनाकामाचं वाढवा करण्याची गरज नाही

पोलीस निरीक्षक – सर बघा आता, सांगा विषय क्लोज झाला, गुन्हा ट्रान्सफर झालाय.

एसपी – मान्य आहे, आम्ही ट्रान्सफर पण केली. मात्र यांनी एवढं का लावून धरला कळत नाही

पोलीस निरीक्षक – सर ते इशू करताहेत,आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे लागता, वगैरै अटक करता,

पोलीस निरीक्षक – सर मी मुंबईचा आहे, मी दोन वर्षे ग्रामीणच आता बघतोय, माझा काहीच इशू नाही सर

एसपी – विषय सिम्पल आहे पॉवरचा ऍरोगन्स आहे,आलं लक्षात, आपल्या कार्यकर्त्यांना दाखवणे, अमूक ढमूक, ठिक आहे, मी अस करू
शकतो, ठिक आहे, आपण आपल काम व्यवस्थीत करायचं आहे

एसपी – आपण जे केले तो योग्य आहे, फक्त विषय असा आहे. ठिक आहे, पाहतो

एसपी – आयजी आणि सिएम साहेबांना सांगण सुरू आहे, तूम्ही आपली बाजू

पोलीस निरीक्षक – सर साभांळून घ्या, आम्ही राजकारणाशी कनेक्ट नाही

एसपी- आयजी साहेबांशी मानसिकता तशी दिसत नाही, रिपोर्ट वरीष्ठांना पाठवावे लागतात, ते डिसीजन घेतील. आम्ही तुमचा डिफॉल्ट रिपोर्ट पाठवणार नाही.
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close