चिक्कीचं कंत्राट देण्यासाठी खडसेंनीच केली होती शिफारस -राणे

August 6, 2015 6:57 PM0 commentsViews:

rane on khadse06 ऑगस्ट : बहुचर्चित चिक्की घोटाळ्याच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणेंनीही उडी घेतलीय. सुर्यकांता या संस्थेला चिक्की खरेदीचं कंत्राट मिळावं यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनीच आपल्याकडे 2012साली शिफारस केली होती असा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केलाय.

महिला बालकल्याण विभागातला चिक्की घोटाळा समोर आल्यानंतर भाजपने सुर्यकांता संस्थेला दिलेलं हे कंत्राट हे राणेंच्या काळातच दिलं गेल्याचा खुलासा करण्यात आला होता. त्यावर राणेंनी या चिक्की प्रकरणात एकनाथ खडसेंचं नाव पुढे आणून भाजपवरच पलटवार केलाय.

सुर्यकांता संस्थेतला तब्बल 113 कोटींचं कंत्राट देण्यात आलं. यासाठी कोणतंही ई टेंट्रिंग काढण्यात आलं नव्हतं. परस्पर हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आलाय. विशेष म्हणजे सुर्यकांता संस्थेनं वाटप केलेली चिक्कीही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे फडणवीस सरकारने चिक्की वाटप बंद केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close