पाच वर्षांच्या मुलाला मिळाली किडनी

December 12, 2009 12:14 PM0 commentsViews: 10

12 डिसेंबर मुंबईत एका पाच वर्षाच्या मुलावर किडनी ट्रान्सप्लान्टचं यशस्वी ऑपरेशन करण्यात आलं. कवलजीत सिंग असं या मुलाचं नाव आहे. कवलजीतला त्याच्या वडिलांचीच किडनी बसवण्यात आली आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये हे यशस्वी ऑपरेशन करण्यात आलं. इतक्या लहान वयाच्या मुलावर किडनी ट्रान्सप्लान्ट करण्याची ही जगातली पहिलाच घटना असल्याचं डॉ. भरत शाह यांनी सांगितलं. लहान मुलांना मोठ्या माणसाची किडनी बसवणं अवघड काम होतं. पण डॉक्टरांनी सर्व अडचणींना तोंड देत हे ऑपरेशन यशस्वी झालं, असं शहा यांनी सांगितलं.

close