पुराच्या तडाख्यातून 24 तासांनंतर टँकरचालकाची सुखरुप सुटका

August 6, 2015 10:43 PM0 commentsViews:

06 ऑगस्ट : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झालीय. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. अंदुरा गावाच्या पुलावरून इंडियन ऑईल कंपनीचा एक टँकर खाली कोसळला होता. दुदैर्वाने या टँकरमध्ये चालक अडकून पडला होता. तब्बल 24 तास या चालकाने पुराशी दोन हात केले. अखेरीस 24 तासांनंतर आपात्कालीन बचाव पथक त्या ठिकाणी पोहचून चालकाचे प्राण वाचवले.

akola34523जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अकोल्यातून वाहणार्‍या पुर्णेलाही मोठा पूर आला. गांधीग्राम वरून वाहणारी पूर्णा नदी बाळापूर तालुक्यातील अंदुरा गावामधून जाते. तिथल्या पुलावरून पाणी जात असल्यानं शेगाव-अकोट मार्ग पूर्णपणे बंद पडला होता. तिथे इंडियन ऑईल कंपनीचा टँकर खाली पडल्यानं चालक अडकून होता.

24 तासानंतर आपतकाली बचाव पथक त्या ठिकाणी पोहचून चालकाचे प्राण वाचवले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपतकालीन बचाव पथक नेमले असतानाही, खासगी बचाव पथकाची मदत शासनाला दरवेळी घ्यावी लागते. अपुरे साहित्य असल्यावरही दरवेळी मदत करणार्‍या संत गाडगेबाबा आपतकालीन बचाव पथक निरंतर आपले कार्य करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close