अर्नाळ्यात 5 पर्यटक बुडाले

December 12, 2009 12:16 PM0 commentsViews: 2

12 डिसेंबर वसईतल्या अर्नाळा समुद्रात 5 पर्यटक बुडाले. त्यापैकी चौघांचे मृतदेह सापडले आहेत. स्वाती, श्वेता, दिपिका आणि अश्विन अशी मृतांची नावं आहेत. यातील तिनही मुलींचं वय 19 वर्षं असून त्या नायगाव कोळीवाडात राहत होत्या. या सर्व मुली कीर्ती कॉलेजमध्ये शिकत होत्या. तर अश्विन 18 वर्षांचा होता. तो अँटॉप हिल इथे राहत होता. नागेश आणि मनोहर हेसुद्धा पोहायला गेले होते. पण त्या दोघांना वाचवण्यात यश आलं. हे सर्वजण ताडी प्यायले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर एकाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

close