‘मी हेल्मेट घालूनच गाडी चालवेन…’, दुचाकी घेण्याअगोदर द्यावं लागेल शपथपत्र ?

August 6, 2015 11:46 PM0 commentsViews:

helmet ravate3306 ऑगस्ट :’मी हेल्मेट घालूनच गाडी चालवेन अन्यथा मी न्यायालयाचा अवमान केला असं समजावं,’ असं शपथपत्र यापुढे तुम्हाला दुचाकीचा परवाना मिळवण्यापूर्वी द्यावं लागू शकतं. कारण असं शपथपत्र वाहनचालकांकडून लिहून घेण्याचा विचार राज्य सरकार करतंय अशी माहिती दिलीय खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी. दिवाकर रावते आज (गुरुवारी) बेस्टच्या कुर्ला इथल्या पुर्नविकसित करण्यात येणार्‍या डेपोच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

वाहनचालक बरेचदा हेल्मेट न घालता गाडी चालवतात. अशावेळी छोटा अपघातही जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे हेल्मेटची सक्ती केली जाते. पण अजूनही वाहनचालक या सक्तीकडे गंभीरपणे पाहात नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या शपथपत्रात न्यायालयाचा उल्लेख झाल्यास जास्त गंभीरतेनं घेतलं जाईल असा सरकारचा विचार असावा, असं दिसतंय. त्यामुळेच रावते यांनी दुचाकीचा परवाना देते समयी वाहनधारकांकडून शपथ पत्र लिहून घेऊ असा नवा तर्कच लढवलाय. एवढंच नाहीतर या शपथपत्रात जर हेल्मेटचा वापर केला नाही तर कोर्टाचा अवमान केला अशी जबाबदारी वाहनधारकाची राहिल असं रावतेंनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close