माता न तू वैरणी, आईने केली बॅटने मारुन मुलाची हत्या

August 6, 2015 11:57 PM0 commentsViews:

pune_crime43563406 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये सख्या भावानं बहिणीची हत्या केल्याच्या प्रकरणाला चोवीस तास उलटत नाही, तोच पुण्यात आईनं आपल्या मुलाची बॅटने मारुन हत्या केल्याची घटना समोर आलीये. केवळ वडिलांकडे जाण्याचा हट्ट धरल्यामुळे संतापून या क्रूर आईंने 13 वर्षांच्या लहानग्याला संपवून टाकलंय. चैतन्य गालपांडे असं या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी या महिलेविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केलाय.

या महिलेला ताब्यात घेण्यात आलंय. विशेष म्हणजे ही महिला उच्चशिक्षित असून, ती एका कंपनीत एचआर एक्झिक्युटीव्ह म्हणून कार्यरत आहे. पती पत्नीमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. त्यातचं मुलानं वडीलाकडे जाण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे संतापून या मातेनं आपल्याचा मुलाची हत्या केली. विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close