उधमपूरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

August 7, 2015 9:03 AM0 commentsViews:

udhampur-l

07 ऑगस्ट : काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात एका दहशतवाद्याला जिवंत पकडल्याच्या एका दिवसानंतर याचठिकाणी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. काल रात्री 9.15 च्या आसपास 2-3 दहशतवाद्यांनी उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड पोलिस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस स्थानकाचे1जणं जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

यासाठी अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा पाठवण्यात आली असून दहशतवाद्यांबरोबर चकमक अजूनही सुरूच आहे. उधमपूरच्या हल्ल्यासंदर्भात डीएम शाहिद इक्बाल यांनी माहिती दिली.

उधमपूरमध्ये दोनच दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. बीएसएफने ग्रामस्थांच्या मदतीने दहशतवादी मोहम्मद नावेद ऊर्फ उस्मानला जिवंत पकडलं होतं. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close