टिंग्याचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार

December 12, 2009 1:15 PM0 commentsViews: 1

12 डिसेंबर टिंग्या चित्रपटातील बालकलाकार शरद गोयेकरचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. आयबीएन-लोकमतने सर्वप्रथम त्याच्या उघड्या माळरानावरील घराची व्यथा मांडली होती. त्याच्या घरासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. शासनानेही टिंग्याला जागा उपलब्ध करुन दिली. शुक्रवारी दुपारी त्याच्या नव्या घराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. घर पूर्ण झाल्यावर टिंग्याला मिळालेले पुरस्कार आता सुरक्षित ठेवता येतील.

close