FTII मध्ये विद्यार्थ्यांच्या संपामुळे 82 जणांच्या नोकरीवर गदा

August 7, 2015 6:51 PM0 commentsViews:

FTII07 ऑगस्ट : पुण्यातील FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांवर आता प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केलीये. या संपाचा फटका आता कर्मचार्‍यांना बसलाय.संप सुरू असल्याने कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या 82 जणांना कामावरुन तात्पुरत काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

त्याचबरोबर 30 विद्यार्थी हे कोर्स संपल्यानंतरही हॉस्टेलमध्ये राहतात. त्यांना हॉस्टेल रिकामे करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 2008 च्या बॅचच्या विद्यार्थ्याचे असाईंमेंट लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती FTII चे निर्देशक प्रशांत पाथराबे यांनी दिली.

विशेष म्हणजे, गजेंद्र चौहान यांच्या संचालकपदाच्या नियुक्तीवरुन विद्यार्थ्यांनी संप पुकारलाय. विद्यार्थ्यांच्या संपाला 50 हून अधिक दिवस झाले आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि सेलिब्रेटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. पण, तरीही सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close