बुलडाण्यात सप्तश्रृंगी मंदिरात चोरी

August 7, 2015 7:10 PM0 commentsViews:

buldhana chori4407 ऑगस्ट : बुलडाणा येथील शेगावच्या सप्तश्रृंगी मंदिरात चोरी झाल्यामुळे खळबळ उडालीये. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून चोराने देवीच्या मंदिरातील गाभार्‍याचे कुलूप तोडून चांदीचे छत्र आणि सोन्याच्या पोथा असे हजारो रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे.

मंदिरातील मूर्तीवर असलेले लहान मोठे 3 चांदीचे छत्र आणि 2 सोन्याचे मंगळसूत्र चोरण्यात या चोरट्याला यश आले आहे. संबंधित प्रकारबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. तपासात पोलिसांना दानपेटी आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य आणि सीसीटीव्ही कॅमेरे एका शेतात आढळून आले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close