पाकमध्ये होणार्‍या राष्ट्रकुल परिषदेवर भारत घालणार बहिष्कार

August 7, 2015 10:05 PM0 commentsViews:

sharif-congratulates-modi-on-election-victory-16052014175028707 ऑगस्ट : सीमारेषेवर वाढता तणाव आणि दहशतवादी हल्ल्याच्या नापाक हल्ल्याचे पडसाद आता भारत-पाकिस्तान संबंधावर पडण्याची चिन्ह आहे. भारत राष्ट्रकुल संसद परिषदेवर बहिष्कार घालणार आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात राष्ट्रकुल संसद परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेला जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आमंत्रण मिळालं पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या अध्यक्षांना आमंत्रण मिळालं नाही तर बहिष्कार घालणार असल्याची माहिती लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीर वादग्रस्त भूभाग असल्याची पाकिस्तानची भूमिका आहे, त्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा अध्यक्षांना बोलावणार नाही असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. 30 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत ही परिषद होणार आहे. दरम्यान, ही परिषद दुसर्‍या देशात भरवण्यात यावी अशी मागणी भारतानं केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close