मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

August 8, 2015 3:35 PM0 commentsViews:

local rape case308 ऑगस्ट : मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कायक घटना घडलीये. ग्रँन्ट रोड ते चर्नी रोड प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. या घटनेमुळे लोकल ट्रेनमध्ये महिला किती सुरक्षित आहेत हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

शुक्रवारी रात्री 11.08 च्या सुमारास ग्रॅण्ड रोड स्टेशनवर लोकल आली असता एक तरुण महिला डब्यात चढला. डब्यात पीडित तरुणी एकटीच होती. डब्यात पोलीस सुरक्षारक्षकही नव्हता. याचा फायदा घेत तरुणाने पीडित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. तिचे कपडेही फाडले. जीवाच्या आंकाताने या तरुणीने आरडाओरड केली. आपण पकडले जाऊ या भीतीने या तरुणाने चर्नी रोड स्टेशनजवळ येताच लोकलमधून उडी मारली आणि पळ काढला. पीडित तरुणीने एका प्रवाशाला घडलेली हकीकत सांगितली. या प्रवाशाने मरिन लाईन्स स्टेशन मास्तरांची केबीन गाठली आणि सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रँन्ट रोड आणि चर्नी रोड स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यात हा तरुण आढळून आला. पोलीस आता या आरोपीचा शोध घेत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close