प्रवीण महाजनची प्रकृतीत सुधारणा नाही

December 14, 2009 10:17 AM0 commentsViews: 2

14 डिसेंबर प्रवीण महाजन यांच्या प्रकृतीत अजून कुठलीच सुधारणा झाली नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. शुक्रवारी रात्री ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रवीण महाजन यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने ते कोमात गेले आहेत. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे. प्र्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणातले प्रमुख आरोपी प्रवीण महाजन यांच्या पॅरोलचा 11 डिसेंबर, शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. पण त्यांना शुक्रवारी रात्री चक्कर आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. प्रवीण महाजन यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे. ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी प्रवीण महाजनच्या सध्याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली.

close