निरंजन डावखरेंच्या नियुक्तीविरोधात कार्यकर्त्यांची पेटवून घेण्याची स्टंटबाजी

August 8, 2015 5:10 PM0 commentsViews:

niranjan dawakhare3208 ऑगस्ट : पुण्यात राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नियुक्तीविरोधात स्वतःला पेटवून घेण्याची स्टंटबाजी करणार्‍या दोन्ही कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीये.

शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. आज पुण्यातील मेळाव्यात कार्यकर्त्याचे नाराजीनाट्य पाहण्यास मिळालं. दोन कार्यकर्त्यांनी चक्क पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वीचे युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांना बदलून डावखरेंच्या नियुक्तीला विरोध दर्शवण्यासाठी भर सभेतच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

उमेश पाटील समर्थकांच्या स्टंटबाजीमुळे मेळाव्यात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. पण पोलीस आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांना वेळीच रोखलं आणि पुढचा कार्यक्रम सुरू झाला. पण यानिमित्ताने राष्ट्रवादीतले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आलेत. हे दोन्ही कार्यकर्ते नाशिकचे आहेत. राष्ट्रवादीने या दोघांनाही पक्षातून निलंबित केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close