पुन्हा ‘टाळी’चे संकेत, राज आणि उद्धव ठाकरेंची झाली गुप्त बैठक ?

August 8, 2015 5:45 PM2 commentsViews:

raj and uddhav08 ऑगस्ट : शिवसेना आणि मनसेत दोस्तीचं नवं पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईत शुक्रवारी रात्री एक गुप्त बैठक झालीये. या बैठकीमुळे चर्चेला उधाण आलंय. कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर पालिका निवडणुकांसंदर्भात ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

विधानसभा निवडणुकीत ‘टाळी’ वाजता वाजता राहिली. राज ठाकरेंनी स्वत:हून हातपुढे केला होता. तर उद्धव ठाकरेंनीही मूक संमती दिली होती. पण, जाहीरपणे ही मैत्री होऊ शकली नाही. येत्या ऑक्टोबरमध्ये कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर पालिका निवडणुका होणार आहे या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘टाळी’ वाजणार अशी शक्यता निर्माण झालीये. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री एक गुप्त बैठक पार पडली.

कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर पालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. या पालिका निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा सूर या बैठकीत दिसून आला. युती होणार का हा प्रश्न मात्र कायम असल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी भय्यू महाराज यांची भेट घेतली होती. यावेळी युतीबाबत चर्चाही झाली होती. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणून राज आणि उद्धव यांची होणं गरजेचं होतं. अखेर ती भेटही आता झालीये. पण युती होणार का ? , हा प्रश्न मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • suyog kute

    युती होणार

  • tanya

    Yuti honarach ani bjp la dohni bhau gadnarach

close