रस्त्यावरचे उत्सव रस्त्यावरंच होणार -विनोद तावडे

August 8, 2015 7:42 PM0 commentsViews:

vinod tawade308 ऑगस्ट : रस्त्यावर सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी हायकोर्टाने नियामवली जारी केलीये. मात्र, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी याबद्दल आक्रमक भूमिका घेतलीये. रस्त्यावरचे उत्सव रस्त्यावरंच होणार असं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय.

काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने रस्त्यावर उत्सव साजरे करता येणार नाही. रस्त्यावर उत्सव साजरे करणे हा अधिकार नाही असं हायकोर्टाने नमूद केलं होतं. पण हायकोर्टाच्या नियमावलीनंतर पुढार्‍यांची टोलेबाजी सुरू झाली आहे.

विनोद तावडे या विषयाला घेऊन आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे गणेशोत्सवात विघ्न येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गणेश उत्सवात कोणतही विघ्न येणार नाही अशी ग्वाहीच मुख्यमंत्र्यांनी दिलीये.

तसंच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यावरचे गुन्हे मागे घेणार तसा अध्याधेश काढलाय अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close