आंध्रप्रदेश विधानसभा अनिश्चित काळासाठी स्थगित

December 14, 2009 10:24 AM0 commentsViews: 7

14 डिसेंबर आंध्रप्रदेशची विधानसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशमध्ये स्वतंत्र तेलंगणाच्या विरोधात 20 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष द्विधा मनस्थितीत सापडला आहे. तेलंगणावरून राज्यभरात आंदोलन पेटलं आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. पण तेलंगणा मुद्द्यावर लवकरच तोडगा काढला जाईल त्यामुळे आंध्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याच विषयावर आंध्र प्रदेशातले काँग्रेसचे नेते लगडापती राजगोपाल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

close