‘सुखविंदर कौर’ची ‘राधे माँ’ कशी झाली ?

August 8, 2015 8:48 PM0 commentsViews:

08 ऑगस्ट : हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाच्या आरोपामुळे डान्सिंग धर्मगुरू पुन्हा वादात सापडलीय. निकी गुप्ताने राधे माँ विरोधात तक्रार दिल्याने मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचेही आदेश दिलेत. पण राधे माँ नेमकी आहे तरी कोण ?, ती तथाकथित देवी माँ नेमकी बनली तरी कशी? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत. म्हणूनच हा विशेष वृत्तांत…

radhe maa_celebrity (6)राधे माँ…एक वादग्रस्त आणि स्वयंघोषित देवी माँ..या राधे माँचा पेहरावही मोठा गंमतीशीर आहे…एका हातात त्रिशूल…तर दुसर्‍या हातात गुलाबाचं फूल…पायात लाखाचे श्यूज….अंगावर 7 लाखाची भरजरी साडी…चेहर्‍यावर भडक मेकअपचा वज्रलेप…आणि डोळ्यावर महागडा गॉगल…तर मंडळी अशी आहे कलियुगातली ग्लॅमरस देवी माँ…बरं या राधे माँला धर्मगुरू म्हणावं तर ती प्रवचन वैगरे काहीच देत नाही…मग तुम्ही म्हणाल…ती आपल्या भक्तगणांना ज्ञान देते तरी कशी….तर मंडळी या राधे माँची तर्‍हाही न्यारीच…ती म्हणे डान्स करून दमल्यानंतर ज्या भक्ताच्या बाहुपाशात अर्थात मिठीत कोसळते त्या भक्ताला बरकती येते म्हणतात…

असो….धारणा असते बुवा एकऐकाची त्याला आपण तरी काय करणार म्हणा…धन्य ते भक्त आणि धन्य ती ग्लॅमरस देवी माँ…राधे माँचा बोरिवलीत मोठा दरबारही भरतो म्हणे…तिचे भक्त त्याला ‘माता की चौकी’ असं म्हणतात…तेव्हा सांभाळून बरं…नाहीतर या आसाराम बापू सारखे राधे माँचे भक्त आपल्यावर चिडायचे…या राधे माँचे भक्तगणही मोठमोठे सेलिब्रिटी आहेत बरं…अगदी डॉली बिंद्रापासून ते शो मॅन सुभाष घईपर्यंत अशी ही भक्तांची भलीमोठी मांदियाळीच राधे माँच्या दरबारात न चुकता हजेरी लावतात….फक्त हजेरीच लावत नाहीत तर राधे माँच्या झोळीत भरभरून दानही टाकतात…मग राधे माँही त्यांना घायाळ नजरेनंच बरकतीचा आशिर्वाद देते म्हणे…सगळी गंमत हे नाही…पण इथं मूळ मुद्दा असा आहे की….एका शिवणकाम करणारी गृहिणी थेट राधे माँ कशी झाली. तर मंडळी त्याचाही इतिहास मोठा रंजक आहे….

राधे माँचं खरं नाव हे सुखविंदर कौर…ती मुळची पंजाबच्या हौशियारपूर जिल्ह्यातल्या मुकीयारन या खेड्यातून आलेली…तिला दोन मुलं देखील आहेत…तिथं तिच्या पतीचं छोटसं मिठाईचं दुकान होतं. पण त्यात घरखर्च भागत नसल्याने हीच राधे माँ आय मीन पूर्वाश्रमीची सुखविंदर कौर शिवमकामही करायची…पुढे याच सुखविंदर कौर उर्फ बेब्बोने मंहत रामदिन यांचं शिष्यत्व पत्कारलं…त्यांनीच तिच्यातला ‘सो काल्ड’ आध्यात्मिक स्पार्क ओळखून तिला राधे माँ हे नावं दिलं…तेव्हापासून ती स्वतःला देवीचा अवतार समजते…आणि स्वतःला असुरक्षित समजाणारे भाबडे भक्तही तिच्यापुढे या ग्लॅमरस डान्सिंग गर्लला देवीचा अवतार समजून तिच्या पायाशी लोळण घेतात…त्यानंतरच मग ही राधे माँ डान्स करता करता एखाद्या पैसेवाल्या आणि दानशूर ‘भक्तकी गोद में लेट जाती है..’तर मंडळी अशा आहेत या राधेमाँच्या अगाध लीला…..अगदी थेटच सांगायचं झालं ही राधे माँ म्हणजे आसाराम बापूंची लेडी व्हर्जनच म्हणा की….बघुयात…आसाराम बापू प्रमाणेच ही राधे माँ देखील पोलीस खरंच अटक करतात की नाही…तोपर्यंत आपलं चालुद्या राधे राधे….

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close