वादग्रस्त ‘राधे माँ’ची मुंबई पोलिसांकडून चौकशीची शक्यता

August 9, 2015 11:46 AM0 commentsViews:

raadhe_maa

09 ऑगस्ट : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँ आज मुंबईत दाखल झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मुंबई पोलीस सोमवारी राधे माँला समन्स बजावण्याची शक्यता असून तीची चौकशी करण्यात येणार आहे.

वादग्रस्त राधे माँ आज (रविवारी) सकाळी 8च्या सुमाराला नांदेडहून विमानाने मुंबईत दाखल झाली. यावेळी राधे माँच्या स्वागतासाठी तिच्या समर्थकांनी एअरपोर्टबाहेर गर्दी केली होती. राधे माँवर मुंबईतील बोरिवलीमधल्या निकी गुप्ता या महिलेने कौटुंबिक छळाचा आरोप केला आहे.

याप्रकरणी निकी गुप्ताच्या सासरच्या सहा जणांसह राधे माँविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतर उद्या (सोमवारी) राधे माँला समन्स बजावून तिची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राधे माँच्या अडचणीत वाढ होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close