फॉक्सकॉनची राज्यात 35 हजार कोटींची गुंतवणूक

August 9, 2015 3:47 PM0 commentsViews:

‡ÖêË»ÖÖê®ÖÝÖê »ÖÖÖÖî¸üÛú

09 ऑगस्ट : डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेली फॉक्सकॉन कंपनी पुणे आणि मुंबई परिसरात 35 हाजर कोटी रुपयांची (पाच अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. ही कदाचित देशातील सर्वांत मोठी थेट परदेशी गुंतवणूक ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी) दिली. त्यामुळे महाराष्ट्र विकासाच्या वाटचालीत या कराराची महत्वाची भूमिका असणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि या कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्या उपस्थितीत मुंबईत या संदर्भातील करार काल (शनिवारी) करण्यात आला. त्यानुसार येत्या पाच वर्षांत ही कंपनी पाच अब्ज डॉलर्सची (सुमारे 35 हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार असून, त्यातून 50 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांनी चीन दौर्‍यात फॉक्सकॉनच्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती आणि राज्यात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार झालेल्या या कराराद्वारे फॉक्सकॉनचे प्रकल्प मुंबई आणि पुणे दरम्यान उभे राहतील आणि तळेगावमध्ये त्यांचा प्रकल्प असेल, असंही त्यांनी सांगितलं. आयपॅड-आयफोन, तसंच विविध कंपन्यांच्या टीव्हीचे स्क्रीन्स, चिप्स आदी उपकरणांची निर्मिती या कंपनीमार्फत करण्यात येतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close