पत्रकारांवरील हल्ल्याविरोधातील विधेयक अधिवेशनात मांडणार – मुख्यमंत्री

December 14, 2009 10:31 AM0 commentsViews: 4

14 डिसेंबर पत्रकारांच्या हल्ल्याच्या विरोधातलं विधेयक या अधिवेशनात आणण्याचं आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं. विधेयक आणण्याच्या मागणीसाठी पत्रकारांनी विधीमंडळाच्या रिपोटीर्ंगवर सोमवारी बहिष्कार टाकला होता. पुण्यात पत्रकाराला झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींना तात्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी पत्रकारांनी जोरदार निदर्शनं केली. पत्रकारावरील हल्लाप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांची भेट घेतली. आणि आपली भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पत्रकारांनी आपला बहिष्कार मागे घेतला.

close