झारखंडच्या बाबा बैद्यनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 11 भाविकांचा मृत्यू

August 10, 2015 9:09 AM0 commentsViews:

JHARKHAND ACCIDENT

09 ऑगस्ट : झारखंडच्या देवघरमधील बाबा बैद्यनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

देवघरचं बाबा बैद्यनाथ मंदिरात हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून 50 शक्तीपिठापैकीही एक शक्तीपीठ आहे. श्रावणी सोमवारनिमित्त हजारो नागरिकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. कवाडवाले इथे आज पहाटे साडे चारच्या सुमारास जलाभिषेकसाठी भाविक रांगेत उभं असताना ही घटना घडली. भाविकांसाठी तयार करण्यात आलेली रांग अरुंद असल्यामुळे, तिथल्या स्थानिक प्रशासनाला ही गर्दी सांभाळणं अशक्य झालं आणि त्यामुळं ही चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती देवघरचे उपायुक्त अमित कुमार यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close