दुसरी वनडे मॅच नागपूरमध्ये

December 14, 2009 10:33 AM0 commentsViews: 1

14 डिसेंबर भारत-श्रीलंका यांच्यात अठरा तारखेला होणारी विशाखापट्टणमची वन डे मॅच रद्द करण्यात आली आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या मागणीवरुन आंध्रप्रदेशमध्ये सध्या वाद पेटला आहे. त्याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. क्रिकेट मॅचसाठी लागणारी सुरक्षा पुरवायला विशाखापट्टणमच्या पोलिसांनी असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे ही मॅच आता नागपूरला खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. भारत- श्रीलंका वन डे सीरिज मंगळवारपासून सुरु होणार आहे.

close