राधे माँला पोलिसांचा समन्स

August 10, 2015 10:19 AM0 commentsViews:

radhe maa 1

10 ऑगस्ट : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ यांच्या विरोधात दाखल झालेल्या हुंडाबळीच्या गुन्ह्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी रविवारी समन्स बजावले आहे. आता त्यांना चार दिवसांच्या आत कांदिवली पोलीस ठाण्यात हरज राहावं लागणार आहे.

सासरच्या कुटुंबियांकडून आपला शारिरीक आणि मानसिक छळ होत असून त्याला राधे माँ जबाबदार असल्याचा आरोप निक्की गुप्ता या विवाहितेने केला होता. निक्की हिने दिलेल्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी नुकतीच राधे माँसह सात जणांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, राधे माँविरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. राधे माँमुळे गुजरातमधल्या कच्छमध्ये 7 जणांनी आत्महत्या केल्याची तक्रार रमेश जोशी यांनी केली आहे. राधे माँविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कांदिवली पोलिस स्टेशन आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे त्यांची याबाबत तक्रार केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close