26/11 हल्ल्याच्या वेळी हेडली पाकिस्तानमध्ये

December 14, 2009 10:36 AM0 commentsViews: 2

14 डिसेंबर मुंबई हल्ल्याच्यावेळी दहशतवादी डेव्हिड हेडली पाकिस्तानमधल्या कंट्रोल रुममध्ये होता. अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानमध्ये ज्या ठिकाणाहून मुंबई हल्ल्याची सूत्रं हलवण्यात आली त्या ठिकाणी डेव्हिड हेडली उपस्थित होता. ताज, ट्रायडंट या हॉटेलमध्ये कसं शिरायचं, हॉटेलमधून बाहेर कसं पडायचं याबाबतच्या सूचना पाकिस्तानमधून मिळत होत्या. भारताने एफबीआयकडे हेडलीच्या आवाजाचा नमुना मागितला आहे. डेव्हिड हेडली हा संशयित दहशतवादी असून सध्या तो एफबीआयच्या ताब्यात आहे. मुंबई हल्ल्याच्या आधी हेडली नऊ वेळा भारतात आला होता. तर हल्ल्यानंतर तो एकदा भारतात आला होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.

close